बाळाला जन्म देणं ही स्रीच्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट असते. पण मातृत्वासाठी आतुर असूनही गर्भधारणा होत नसेल तर या वंध्यत्वाचे कारण पीसीओएस असू शकेल. सध्या जगभरातील स्त्रियांमधील वंध्यत्वाचे कारण पीसीओएस हे आहे. भारतातील दर १० स्त्रियांपैकी १ स्त्री ही पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम म्हणजेच पीसीओएसने ग्रस्त आहे. यावर योग्य उपचार होण्यासाठी हा आजार होण्याची मूळ कारणे समजून घेतली पाहिजेत.
पीसीओएस म्हणजे नक्की काय?
पीसीओएस हा स्त्रियांच्या प्रजननसंस्थेशी संबंधित आजार असून, यात इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या अंतस्त्रावांचे प्रमाण बिघडलेले असते. पीसीओएस हा आजार प्रामुख्याने बिघडलेल्या जीवनशैलीचा दुष्परिणाम आहे. आहार, विहार, व त्रिसूत्रीच्या साहाय्याने जीवनशैलीत बदल केल्यास त्वरित परिणाम दिसू लागतात व एकूणच आरोग्य सुधारून इतरही अनेक चांगले परिणाम जाणवतात.
पीसीओएस हा आजार कसा होतो ?
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम हा स्त्रियांच्या प्रजननसंस्थेशी संबंधित अंतस्त्रावांचा आजार आहे. योनीभाग, गर्भाशय, बीजांडकोश आणि बीजवाहिनी नलिका हे प्रजननसंस्थेचे प्रमुख भाग आहेत. सामान्यतः अंडकोषामध्ये बीजांडाची क्रमाने वाढ होत जाते. परिपूर्ण झालेले बीज बीजांड फोडून अंडकोषातून बाहेर पडते. ते बीजवाहिनी नलिकेत वहन केले जाते. पीसीओस मध्ये मात्र बीजांडाची पूर्ण वाढ होऊ शकत नाही. अपूर्ण वाढ झालेली बीजांडे बीजांडकोषाच्या आत साठत जातात. यालाच पॉलिसिस्टिक ओव्हरी असे म्हणतात.
पीसीओएस मुळे कोणत्या व्याधी होतात?
पीसीओएस हा चिरकालीन आजार असून योग्य उपचार न झाल्यास अनेक वर्षे किंवा आयुष्यभर त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. पीसीओएसचे योग्य निदान न झाल्यास खालील व्याधी होऊ शकतात
- वंध्यत्व
- गर्भाशयाच्या अंत:स्तराचा कर्करोग
- मधुमेह प्रकार २
- उच्च रक्तदाब
- गर्भाशयाचा कर्करोग
- ह्रदयरोग
- झोपेतील श्वसनाचा त्रास
- यकृताचे विकार
पीसीओएस मुळे स्त्रियांमध्ये शारीरिकच नाही तर मानसिक दुष्परिणामही होतात. स्त्रिया गर्भधारणेबद्दल चिंतित व सौंदर्याबद्दल उदास राहू लागतात. निराशा येते.
पीएसीओएस हा आजार पूर्ण बरा होतो का ?
पीएसीओएस हा आजार पूर्ण बरा होत नाही. डॉक्टर पीसीओएसची लक्षणे कमी किंवा दूर करण्यासाठी विविध उपाय सुचवतात. परंतु हा आजार बरा करणारा उपचार सध्या तरी उपलब्ध नाही. मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही. आयुर्वेदात यावर मार्गदर्शन व उपचार उपलब्ध आहेत. पीसीओएस या असाध्य आजारासाठी आयुर्वेद या प्राचीन शास्त्रातील संदर्भांच्या आधारे श्री माऊली विश्व आयुर्वेद येथे उपचारांसंबंधी योग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. आयुर्वेद पीसीओएसची कारणे समूळ नष्ट करीत असल्याने याचे परिणाम दीर्घकाळ टिकतात.
श्री माऊली विश्व आयुर्वेद येथे पीसीओएस वर होणारे उपचार
शरीरात होणारे बदल किंवा आजार समजून घेण्यासाठी सप्तधातूंचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार सप्तधातू शरीराचे धारण करतात. ते सप्तधातू म्हणजे रसधातू, रक्तधातू, मांसधातू, मेदधातू, अस्थिधातू,मज्जाधातू व शुक्रधातू. तसेच, वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष शरीरातीळ मह्त्वाचे भावपदार्थ आहेत. जेव्हा दोष धातूंमध्ये प्रवेश करतात तेव्हा निर्माण होणारी लक्षणे वैद्यांना निदान व उपचारासाठी उपयोगी पडतात.
सप्तधातूचे कार्य
प्रीणनं जीवनं लेपो स्नेहो धारण पुरणे
गर्भोत्पादश्च धातूनां श्रेष्ठ कर्म कर्मात स्मृतम
सातवा धातू शुक्राचे गर्भोत्पादन हे सर्वोत्तम कार्य होय. शुक्रातूनच गर्भोत्पादनासाठी स्त्रियांमध्ये स्त्रीबीज व पुरुषांमध्ये पुरुषबीजाची उत्पत्ती होते. पीसीओएस मुले बीजनिर्मितीत अडथळा निर्माण होतो. म्हणूनच पीसीओएसचे उपचार करताना धातूंचे संतुलन व पोषण बीजनिर्मितीसाठी महत्वाचे असते. आर्तवम आग्नेयम म्हणजेच स्त्रीबीज हे अग्निप्रधान असते. पीसीओएस मध्ये इन्शुलिनला अवरोध असतो आणि चयापचयही बिघडलेले असते. म्हणूनच बीजनिर्मितीसाठी चयापचयावर नियंत्रण असणे आवश्यक असते.
पीसीओसीचा योग्य उपचार
आयुर्वेदानुसार प्रत्येक धातूला स्वतंत्र पचनशक्ती असते ज्याला धातवाग्नी असे म्हणतात. थोडक्यात चयापचय नैसर्गिकपणे निरोगी करणे हा पीसीओसीचा योग्य उपचार होय.
यात खालील बाबींचा समावेश होतो,
- औषधी चिकित्सा
- पंचकर्म
- उत्तरबस्ती
- जीवनशैलीतील बदल
- मानसिक समुपदेशन
पीसीओसीची सामान्य लक्षणे
पीसीओसी मध्ये सर्वसाधारणपणे खालील लक्षणे आढळतात.
- मासिक पाळीची अनियमितता किंवा अभाव
- चेहरा व शरीरावर अनावश्यक केसांची वाढ
- वजन वाढणे
- मनस्थितीत दोलायमानता
- तेलकट त्वचा आणि मुरुमे
- डोक्यावरील केस पातळ होणे
तुम्हालाही ही लक्षणे जाणवत असली तर ते पीसीओएस असू शकेल. कोणतेही साईड इफेक्ट्स नसलेल्या नैसर्गिक आयुर्वेदिक उपचारांनी हा विकार बरा झाल्यास नैसर्गिक गर्भधारणा होण्यास मदत होते व उत्तम परिणाम दिसतात. अधिक माहितीसाठी व पीसीओएस वरील अचूक उपचार व सल्ल्यासाठी एसएमव्ही आयुर्वेदला भेट द्या. हे आयुर्वेदिक उपचार एसएमव्ही आयुर्वेद येथे वैद्य डॉ. विनेश नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली होतात.
PCOS आणि वंध्यत्वाविषयी अधिक जाणून घ्या.
आयुर्वेद तज्ञ डॉ. विनेश नगरे यांची ही मुलाखत पहा. सर्व नवीन व्हिडिओजची माहिती मिळविण्यासाठी खालील यूट्यूब बटणवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
Subscribe