hacklink hack forum hacklink film izle hacklink bets10bets10sahabetaviatormeritking giriştop casino en lignegrandpashabet girişmeritking girişmaltepe escortmeritkingmeritking girişmeritking giriştlcasinokingbet188canlı maç izlemarsbahismaltepe escortmaltepe escortnuru massage taksimmeritkingaviatoraviator gamemeritbetmeritbetซื้อหวยCeltabetCeltabetCeltabetMp3JuiceTikTok DownloaderYtmp3Tubidy Mp3Tubidy Mp3 DownloadMp3Juicesmeritkinghttps://jleak.sa.com/Tubidydeneme bonusu veren sitelerpadişahbetgalabetAvandaTimesizmit escortVirüsbetagb99jojobet girişdeneme bonusudeneme bonusualobetjojobetjojobetgalabetgalabetholiganbetholiganbetholiganbetcasino not on GamstopSlots Not on Gamstopdeneme bonusu veren sitelerjojobetcasibomjojobetmeritkingcasibomjojobetjojobet

पीसीओडी मुळे येणाऱ्या वंध्यत्वावर आयुर्वेदाचे प्रभावी अस्त्र

पीसीओडी मुळे येणाऱ्या वंध्यत्वावर आयुर्वेदाचे प्रभावी अस्त्र

 

स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण म्हणजे आई होणं. मातृत्वाच्या अनुभवाला मुकणं हा स्त्रीच्या दृष्टीने अतिशय दुःखद अनुभव ठरतो. सर्व प्रयत्न करूनही मूल न झाल्यास वंध्यत्व असल्याचे मानले जाते. उशिरा लग्न, लग्नानंतरही अधिक काळ कुटुंबनियोजन, ताणतणाव, व्यसने यामुळे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे प्रमाण वाढले आहे. वंध्यत्वाची विविध कारणे आहेत, त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे पीसीओडी. हा आजार नेमका काय आहे ते समजून घेऊन त्यावर योग्य उपचार केल्यास वंध्यत्वदोष निश्चितपणे दूर होऊ शकतो.

पीसीओडी

 

वंध्यत्वाची कारणे

  • गर्भनलिका बंद असणे
  • स्त्रीबीजातील दोष
  • गर्भाशयातील गाठी
  • बीजांडकोषाचे आजार
  • मधुमेह
  • थायरॉईड ग्रंथीची अकार्यक्षमता
  • हार्मोनल असंतुलन

पीसीओडी म्हणजे काय?

आजच्या स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा हा आजार आहे. पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) म्हणजे बीजांडकोषात स्त्रीबीजाची निर्मिती सातत्याने अडकत जाऊन ओव्ह्युलेशन न होणं. बीज असं वारंवार अडकत गेल्याने बीजांडकोषात गाठी होतात. अंडाशयाला सूज येते. मासिक पाळी अनियमित होते व गर्भधारणा न झाल्यामुळे वंध्यत्वाच्या समस्येला सामोरे जावे लागते. पीसीओडीने ग्रस्त असलेल्या स्त्रीचा वारंवार गर्भपात होण्याचा धोका संभवतो.

 

पीसीओडीची लक्षणे

पीसीओडीची खालीलपैकी एक किंवा अनेक लक्षणे आढळल्यास ती त्वरित ओळखून तज्ञांना भेटून त्यांचे निराकरण करायला हवे. य सर्व एकत्रित लक्षणांचा परिणाम स्त्रीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर तर होतोच. शिवाय मनस्वास्थ बिघडल्याने लैंगिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होऊन गर्भधारणेस आणखी विलंब होऊ शकतो.

  • अनियमित पाळी
  • गर्भ न राहणे किंवा न टाळणे
  • पाळीच्या वेळी जास्त रक्तस्त्राव व वेदना
  • चेहरा व शरीरावर पुरुषांसारखे केस येणे
  • स्थूलता, अशक्तपणा
  • मुरुमं व पुटकुळ्या
  • काळसर त्वचा
  • केस गळणे व डोके दुखणे

पीसीओडीची कारणे

पीसीओडी होण्याची कारणे मुख्यतः जीवनशैलीशी संबंधित आहेत. या कारणांवर विनाविलंब उपचार करायला हवेत.

  • बैठी, अनियमित व अनैसर्गिक जीवनशैली
  • कुपोषण व आहारदोष
  • व्यायामाचा अभाव
  • सतत प्रक्रियायुक्त, पॅकबंद अन्न खाण्याने आलेली स्थूलता
  • अनुवांशिकता
  • मधुमेह

अनियमित पाळी

मासिक पाळीत बीजांडकोषामधील फलित न झालेले स्त्रीबीज रक्ताबरोबर शरीराबरोबर टाकले जात असते. पिट्युटरी ग्रंथीतील, एफएसएच व बीजांडकोषातील इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन हि संप्रेरके मासिक पाळीचे चक्र व्यवस्थित चालण्यास मदत करीत असतात. त्यांचे संतुलन योग्य असल्यास गर्भधारणा होते. मात्र पीसीओडीमुळे या संप्रेरकांचे संतुलन बिघडून पाळी अनियमित होते. हे स्त्रियांचे आजार वंध्यत्व येण्यास कारणीभूत आहेत.

 

वंध्यत्वावर आयुर्वेदिक उपचार

वंध्यत्वावर आयुर्वेदात अनेक प्रकारचे उपचार आहेत. स्त्रीबीज हे आयुर्वेदात अग्निस्वरूप मानले गेले आहे. हा अग्नी मंद होऊन येणारे अग्निमांद्य व वात – पित्त – कफ या त्रिदोषांच्या असंतुलनामुळे वंध्यत्व येते असा आयुर्वेदाचा निष्कर्ष आहे. आहार – व्यायाम – औषधे या त्रिसूत्रीने वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे.

वंध्यत्वावर आयुर्वेदाने सांगितलेले काही उपाय

  • अन्न हे पूर्णब्रह्म असे मानून सात्विक अन्नाचे सेवन
  • ओज म्हणजेच ऊर्जा व शक्ती वाढविणारे पदार्थ खाणे
  • संपूर्ण पोषण देणारी धान्ये,मसाले, औषधी वनस्पती, हळद, जिरे, प्रथिने यांचे सेवन
  • ट्रान्स फॅट्स, कृत्रिम रंग असलेले पदार्थ, पॅकबंद पदार्थ न खाणे
  • आम नष्ट करण्यासाठी नोरोगी अग्निवर्धक अन्न घेणे
  • वात निर्मूलनासाठी नियमित व्यायाम व आयुर्वेद उपचार
  • वमन, विरेचन व बस्ती हे आयुर्वेदिक उपचार
  • शतावरी, कोरफड, दशमूळ, गुग्गुळ यांसारख्या आयुर्वेदिक औषधींचा उपयोग

आयुर्वेदिक उपचारांमुळे शरीर व मनावरचा ताण हलका होऊन अशुद्धी निघून जातात. शरीराचे पोषण होते. प्रतिकारशक्ती सुधारते. वात नष्ट होतो. रक्तभिसरण सुधारते. या सकारात्मक बदलामुळे वंधत्वावरील उपचारांना शरीर प्रतिसाद देऊ लागते. कोणतेही दुष्परिणाम नसलेले आयुर्वेदिक उपचार वंध्यत्वावर उत्तम परिणाम देतात व मातृत्वापासून वंचित राहिलेल्या स्त्रीला जणू वरदानच ठरतात.

 

Know More About PCOD, Infertility & Ayurveda

Watch Dr Vinesh Nagare’s exclusive interview. To get updates about all the new videos, subscribe to our YouTube channel by clicking on YouTube button below.

 

About SMV Ayurveda

Shri Maulivishwa Ayurveda Research Center is dedicated to research in Ayurveda for women’s health. Vaidya Vinesh Nagare, who is a gynecologist, specializes in Ayurvedic Treatment for Infertility, PCOD/PCOS and other menstrual problems of women.

Get in Touch

Facebook

Youtube Subscribe

Latest Blogs

Categories

Are you looking for appointment?