स्त्रियांची चाळीशी म्हणजे नेमकं काय?
आयुर्वेदात स्त्रीच्या वयाचे निरनिराळे टप्पे पाडलेले आहेत. बाला, गौरी, रोहिणी, कुमारी (टीनएजर) व तरुणी (३५ वर्षापर्यंत जेव्हा स्त्रीच्या शरीरामध्ये संपूर्णव्यवस्था येते ) हे काही टप्पे. त्यानंतर चाळीशीची स्त्री म्हणजे अधिरूढा, ज्यावेळी शरीरात रूढ गोष्टी झाल्या आहेत का, कोणत्या समस्या आहेत यांचा अंदाज येतो.
चष्मा अर्थात चाळीशी लागणे हे मज्जा धातूच बल कमी झाल्याचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे चाळीशीत शुक्र धातूच बलही कमी होतं. वात – पित्त – कफ या त्रिसूत्रीपैकी तारुण्यात पित्त म्हणजे अग्नी प्रबल असतो. वय वाढलं की कफाचा शरीर मऊ ठेवण्याचा गुणधर्म कमी होत जातो. त्यामुळे चाळीशीत खालील समस्या जाणवतात:
- स्नायू व हाडांमधला कोरडेपणा वाढते
- शैथिल्य निघून जातं
- चढाची झीज वाढते
म्हणूनच चाळिशीनंतर बोन मॅरोच्या टेस्ट्स जास्त कराव्या लागतात. ऑस्टिपोरॉसिस होतो.
चाळिशीतील स्त्रियांच्या समस्यांचे प्रकार कोणते?
- चाळिशीपर्यंत विवाह झाला नसेल तर गर्भाशय, अंडकोशाचं काम झालेलं नाही, त्यातून होणारं हार्मोन संतुलन झालेलं नाही. नवनिर्मिती झालेली नाही. या वयातील अविवाहित स्त्रियांच्या समस्यांचा वेगळा विचार करावा लागतो.
- तरुण वयापासून गर्भधारणेचे आयव्हीएफसहित अनेक पर्यंत करून चाळिशीला आलेल्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे असतात. त्यांना गर्भधारणेसाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात.
- सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडलेल्या स्त्रियांची चाळीशी येऊन निरनिराळ्या समस्या भेडसावू लागतात. काही वेळा मेनोपॉजची लक्षणं सुरु होतात. त्यांचं योग्य निराकरण करावं लागतं.
चाळीशीत पाळी लांबली तर:
चाळीशीत पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेतल्या की बीजनिर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा येतो. यावेळी पाळी पुन्हा येण्याच्या गोळ्या घेऊ नयेत. स्त्रीत्व टिकणं हे मुख्य उद्धिष्ट हवं. त्वचा, स्नायू चांगले राहणं, हाडे मजबूत राहणे, संपूर्ण शरीर निरोगी राहणे.
नैसर्गिकरित्या पाळी येण्यासाठी काय कराल?
- शतावरी कल्प घ्या
- रात्री हळीव भिजत घालून सकाळी दुधातून खीर करून घ्या
- नियमित व्यायाम सुरु करा
- संतुलित आहार घ्या
ओव्हरीयन सिस्ट म्हणजे काय?
चाळिशीतली एक सर्वसाधारण समस्या म्हणजे ओव्हरीयन सिस्ट. पूर्ण वाढ व्हायच्या आधीच बीजांड हे बीजांडकोषात अडकलं की त्याचा सिस्ट बनतो. मात्र अश्या गाठी वारंवार होऊ लागल्यास पॉलीसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम (पीसीओडी) हा आजार होतो.
पीसीओडीमुळे काय होते?
- त्वचा काळवंडते
- पाळी अनियमित होते
- संप्रेरके असंतुलित होतात
- जाडी वाढते
- केस गळतात
चाळीशीत होणारा बुरशीजन्य संसर्ग
चाळिशीनंतर होणारा बुरशी संसर्ग पटकन जात नाही. कारण बीजांडनिर्मितीच्या वेळी निर्माण होणारी उष्णता योनीभागाचं संरक्षण करीत असते. ती नष्ट होते. काही वेळा शौचाच्या भागाचं इन्फेकशन योनीभागात येतं. ती स्वच्छता मागून केली पाहिजे, पुढून नव्हे. वैयक्तिक स्वच्छता व्यवस्थित केली पाहिजे.
चाळीशीत गर्भधारणा हवी असेल तर काय काळजी घ्यावी?
चाळीशीत शरीरातल्या सर्व धातूंचं बल कमी होत जातं. प्रजननसंस्थेची ताकद कमी होते. बीजनिर्मिती, गर्भाशयाचं अस्तर निर्माण करण्याची क्षमता कमी होते. ती वाढवता येते का? तर येऊ शकते. सध्याच्या जीवनशैलीमुळे होणारी झीज कमी करणे, शरीर शांत करणे यासाठी दोन प्रकारच्या चिकित्सा करतात:
- शोधन चिकित्सा
- शमन चिकित्सा
शोधन चिकित्सेत पंचकर्म करून शरीर मोकळं करतात, त्यामुळे ते सक्षम व्हायला लागतं. एंडीमेट्रीओसिस मध्ये गर्भाशयाच्या अस्तराला सूज येते. यामुळे येणाऱ्या समस्या दूर करून गर्भ रुजण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती करणे जरुरी आहे.
ॲडिनोमायोसिस का होतो?
चाळीशीत स्नायूंना येणारा घट्टपणा म्हणजेच ॲडिनोमायोसिस. गर्भाशयाच्या स्नायूंना घट्टपणा आल्याने केसांसारख्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह वाहण्याची क्षमता कमी होते. यामुळे काही वेळा फायब्रॉइड्स निर्माण होतात. यामुळे गर्भधारणा होणे, गर्भाची वाढ होणे, बाळंतपण होणे अशक्य होते. यावर रसायन चिकित्सेचा उत्तम उपयोग होतो.
रसायन चिकित्सा म्हणजे काय?
रसायन चिकित्सेत ऊर्जा वाढविण्यावर भर असतो. त्यामुले शुक्राचं बल वाढतं, गर्भधारणा शक्य होते. वृद्धत्व कमी करणे, रोग दूर करणे, रोग प्रतिकारक क्षमता वाढविणे हे या चिकित्सेचे ध्येय असते.
अंगाला खाज सुटत असेल तर काय करावे?
वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी खालील घरगुती आयुर्वेदिक उपचार आहेत:
- कटु तेल म्हणजेच मिरपूड तेलात टाकून ठेवलेलं मिरीचं तेल लावावे
- कच्ची कोथिंबीर चावून खावी
कुंडीला लावायची काव तुपावर भाजून हळदीत मिसळून थोडी थोडी दिवसातनं तीनदा खावी
चाळिशीनंतरच्या रजोनिवृत्ती साठी घेण्याची काळजी
रजोनिवृत्तीत बीजनिर्मिती कमी झाल्याने उष्णता वरखाली झाल्याने, अचानक थंडी वाजते, गरम वाटतं, छातीत धडधडल्यासारख, गळून गेल्यासारखं वाटतं. ही लक्षणं तात्कालिक आहेत हे आपण लक्षात ठेवायला हवं. यासाठी उपाय:
- थंड पाणी, दूध, तूप, मध ही ऊर्जादायी रसायने योग्य प्रकारे वापरावीत. थंड पाणी घटाघट कधीही पिऊ नये.
- थंड पाण्यातून आवळा रस, आवळा रस+मध्य घ्यावा.
- मनुकांचा काढा करून थंड झाला कि एक चमचा मध घालून घ्यावा.
- कॅल्शियम साठी एक ग्लास दुधात एक चमचा मध टाकून घ्यावा. मध हा कधीही गरम पाणी किंवा दुधात घेऊ नये.
- जेवणाच्या आधी एक चमचा तूप घ्यावं म्हणजे ते सहज पचतं.
- शरीर कोरडे असल्यास १ चमचा तूप व १ चमचा तेल घ्यावं. आल्याची वडी खावी.
- शरीराला तिळाच्या तेलाने नियमित अभ्यंग करावं.
अश्या प्रकारे नैसर्गिक पद्धतीने सर्वतोपरी काळजी घेऊन चाळिशीला आयुष्यातील एक आनंदायी टप्पा बनवणं प्रत्येक स्त्रीला सहज शक्य असतं आणि तिने ते करायला हवं.
Know More About Women in 40s & Ayurveda
Watch Dr Vinesh Nagare’s exclusive interview. To get updates about all the new videos, subscribe to our YouTube channel by clicking on YouTube button below.
Subscribe