लहान मुलांचे आजारआणि सोपे घरगुती आयुर्वेदिक उपचार – श्री माउलीविश्व आयुर्वेद

आजच्या या लेखात लहान मुलांचे आजार कसे ओळखावे आणि त्यावर घरगुती उपाय काय करावे हे आपण बघणार आहोत.

आज कालच्या धावपळीच्या काळात नोकरीनिमित्त गावाकडील लोक शहरांमध्ये वास्तव्य करायला येतात. अशा वेळेस लहान मुलांना घेऊन शहरात यावे लागते. ज्येष्ठ मंडळी गावाकडे राहण्यास प्राधान्य देतात. त्यात जर दोघे नोकरी करत असतील तर लहान मुलांना पाळणाघरात ठेवावे लागते. शहरात एकटे राहत असल्यामुळे मुलांची काळजी कशी घ्यावी कळत नाही आणि त्यात ते मूल 1 वर्षापेक्षा लहान असेल तर आईची तारांबळ उडते.

लहान मुलांचे आजार

लहान मुलांचे आजार – पोटदुखी

लहान मुलाचे जर पोट दुखत असेल तर ते पोटास हात लावू देत नाही आईचे स्तन चावते. पोट साफ होत नाही नाही इत्यादी लक्षणे दिसतात. यात बऱ्याचदा पोट थंडीने जंताने गॅस झाला असता किंवा शौचाला साफ न झाल्याने पोट दुखते

पोटदुखी – घरगुती आयुर्वेदिक उपचार

  • थंडीने बाळाचे पोट दुखत असेल तर आपले तळहात घासून त्याचा शेक पोटास द्यावा. उबदार कपडे घालावेत.
  • बाळ जर एक वर्षाचे असेल तर फडक्याच्या बोळ्याने किंवा मिठाची पोटली करून त्याचा शेक द्यावा. शेकते वेळी आपल्या हातास आधी पोटली ठेवून बघावे किती गरम आहे मग शेक द्यावा.
  • पोटात जर जंत होऊन पोट दुखत असेल तर एक छोटा चमचा वावडिंगाचे चूर्ण अर्धा कप पाण्यात रात्रभर भिजत घालावे व सकाळी पिण्यास द्यावे.
  • पोटात गॅस झाल्यामुळे बाळाच्या पोटात दुखत असेल तर सुंठ चूर्ण एरंड तेलात भाजून घ्यावे. एक चिमूट भर भाजलेली सुंठ पावडर एक चिमूट भर पादेलोन मिठात घालून बाळास चाटवावे. त्याने पोट साफ होते व गॅसेसचा त्रास कमी होतो.
  • अजीर्ण झाल्यामुळे बाळाचे पोट दुखत असल्यास व बाळ अंगावर दूध पीत असेल तर आईने उपवास करावा किंवा गरम पाणी दिवसभर पीत राहावे. जर बाळ तीन महिन्याच्या आतील असेल तर त्यास बाळगुटी तील वेखंडाचे दोन वेढे पाण्यात उगाळून चाटवावे.
  • बाळाच्या पोटात मुरडा येऊन शौचाला होत असल्यास बाळगुटी तील मुरड शेंगेचे दोन वेढे पाण्यात उगाळून चाटवावे.

लहान मुलांचे आजार - आयुर्वेद

लहान मुलांचे आजार – ताप येणे

  • लहान मुलांना ताप आला असेल तर जास्तीत जास्त आराम द्यावा. जास्त करून द्रवपदार्थ खाण्यास द्यावेत जसे की भाताची पेज मुगाची पेज इत्यादी. दूध शक्यतो ताप आला असेल तर देऊ नये त्यामुळे अपचन होते.
  • ताप आला असेल तर बाळाच्या बेंबीत कांद्याचा रस लावावा. बाजारात लाक्षादि किंवा चंदन बला लाक्षादि तेल मिळते या तेलाने ताप आला असल्यास बाळास मसाज करावा.
  • घरी उपचार करून जर बाळास फरक नसेल तर जवळच्या वैद्याकडे दाखवून चिकित्सा करावी.

पुढच्या भागात आपण बाळगुटी कशी वापरावी आणि त्याचे फायदे काय असतात हे आपण बघणार आहोत. आपल्या कोणत्याही चौकशी साठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.

आयुर्वेद चिकित्सेसाठी Appointment बुक करा

विरुद्ध आहाराबद्दल जाणून घेण्यासाठी नक्की पहा

विरुद्ध आहार म्हणजे नक्की काय, विरुद्ध आहाराचे आयुर्वेदाप्रमाणे कुठले प्रकार असतात आणि त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो याबद्दल माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

Subscribe