मधुचंद्राचा रोमांस संपला की सुरू होतो जबाबदारीच्या जाणिवेचा प्रवास. आता आपल्याला मूल हवे हा निर्णय म्हणजे प्रत्येक जोडप्यासाठी अतीव आनंदाचा क्षण. अपत्यप्राप्तीचा निर्णय तुम्ही घेतला असेल, तर लवकर गरोदर होण्यासाठीच्या या टिप्स माहीत करून घ्या. टप्प्याटप्प्याने होणारी ही प्रक्रिया आहे.
तणाव कमी करून जीवनशैलीत बदल करा
लवकर गर्भधारणा होण्यासाठी दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करा. तुम्हाला मनापासून आवडणाऱ्या गोष्टी करून मनावरचा व शरीरावरचा ताण हलका करा. छंद जोपासा, निसर्गात रमा, नवीन गोष्टी करा, निरोगी जीवनशैली जगा. नियमितपणे व्यायाम करा. भरपूर फळं व भाज्या असलेला प्रथिनयुक्त आहार घ्या. हे सर्व बदल केल्यामुळे शरीरात सकारात्मक बदल होतील व गर्भधारणेस अनुकूल वातावरण तयार होईल.
तपासणी करून घ्या
गर्भधारणा होण्यापुरवी आवश्यक त्या सर्व तपासण्या करून घ्या. तुमच्या स्त्री रोग तज्ञाबरोबर तुमच्या नियोजनाविषयी चर्चा करा. गर्भधारणा होण्यापूर्वी दोन महिने फॉलिक एसिडच्या गोळ्या घेण्याचा सल्ला तुमचे डॉक्टर तुम्हाला नक्की देतील. फॉलिक एसिड मुळे जन्मत: उदभवणाऱ्या काही दोषांना प्रतिबंध होतो. संपूर्ण शरीराची तपासणी केल्याने काही दोष किंवा रोग असतील तर त्यावर गर्भधारणा होण्यापूर्वीच उपचार करता येतात.
तुमच्या मासिक पाळीचे चक्र समजून घ्या
गर्भ राहण्यासाठी तुमचे ओव्यूलेशनचे दिवस माहीत असणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्या मासिक पाळीवर लक्ष ठेवून पाळीचे दिवस निश्चित करा. ओव्यूलेशनपूर्वीच्या दिवसांमध्ये शारिरिक संबंध ठेवल्यास गर्भ राहण्याची शक्यता सर्वाधिक असते.
ओव्यूलेशनपूर्वीच्या दिवसांमध्ये शारिरिक संबंध येऊ द्या
ओव्यूलेशनपूर्वीच्या दिवसांमध्ये शारिरिक संबंध आल्याने शुक्राणू तुमच्या गर्भाशयात किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये राहतात व ओव्हरीजमधून तुमचे अंडे बाहेर पडल्यावर लगेच गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. सर्वसाधारण्पणे २८ दिवसांच्या मासिक पाळीत १४ ते १७ हे दिवस ओव्यूलेशनचे मानले जातात. या काळात दररोज शारीरिक संबंध येऊ द्या म्हणजे अपत्य प्राप्तीची शक्यता वाढते.
शारीरिक संबंधानंतर पलंगावरच झोपून राहा
डॉक्टर असे सांगतात की लैंगिक संबंधानंतर योनी भागाला उतरत्या स्थितीत ठेवले तर, शुक्राणू अंड्याकडे वेगाने जातात. त्यामुळे कंबर उंच करून झोपून राहा. सेक्सनंतर योनीभाग लगेच धुवू नका. यामुळे गर्भधारणा लवकर होण्याची शक्यता वाढते.
वजन नियंत्रणात ठेवा
स्थूलता किंवा अतिरिक्त बारिकपणा या दोन्हीमुळे गरोदर राहण्यात अडथळेच जास्त येतात. म्हणूनच, निरोगी बॉडी मास इंडेक्स व योग्य वजन राहील याची काळजी घ्या. याचं शास्त्रीय कारण असं की, शरीरात चरबी जास्त असेल तर इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतं व ओव्यूलेशन मध्ये अडथळा येतो. अतिशय बारीक स्त्रियांची मासिक पाळी किंवा ओव्यूलेशन अनियमित असू शकतं. त्यामुळे निरोगी वजनासाठी नियमित व्यायाम करा व संतुलित आहार घ्या. धूम्रपान व मद्यपान करू नका. पती,पत्नी दोघांचेही वजन नियंत्रणात असणे आवश्यक आहे.
अति व्यायाम करू नका
अति व्यायाम केल्याने मासिक पाळीचे चक्र बिघडते व ओव्यूलेशन प्रक्रियेत फेरफार होतो. यामुळे गर्भ राहण्यास उशीर होतो. याशिवाय, अति व्यायामाने दमछाक होऊन लैंगिक जीवनातील आनंद हरवून संबंधातील वारंवारता कमी होते व गर्भधारणा होत नाही.
वयाकडे लक्ष ठेवा
वाढत्या वयामुळे स्त्रीच्या अंड्याची संख्या व गुणवत्ता दोन्ही कमी होते. वयामुळे फायब्रॉइड्स, फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेजेस,गर्भाशयाच्या अस्तराची सूज म्हणजेच एन्डोमेट्रिओसिस, यांसारखे स्त्री रोग होतात. गर्भधारणेची शक्यता कमी होते व त्यात अडचणी येतात. अपत्य प्राप्तीचा निर्णय घेण्यापूर्वी वय नक्की तपासून पहा.
गरज असेल तर तज्ञाची मदत घ्या
प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर तज्ञ डॉक्टर चा सल्ला घ्या. ते वंध्यत्व असू शकेल व त्यावर योग्य वेळी उपचार होणे आवश्यक असते.
गरोदर राहण्यासाठी जोडीदाराशी संवाद साधा
लवकर गर्भधारणा कशी होऊ शकेल हे दोन्ही जोडीदारांना माहीत असायला हवे. दोघेही मिळून तुम्ही तुमचे ध्येय सहज व आनंदाने साध्य करू शकता,. डॉक्टरचे मार्गदर्शन निरोगी जीवनशैली, आनंदी, सकारात्मक दृष्टीकोन, योग्य तपासण्या व वेळेवर शारीरिक संबंध यामुळे तुम्ही लवकर गरोदर राहू शकता.
निरोगी गर्भारपण हे गरोदर राहण्याच्या आधीपासून सुरू होते. यासाठी योग्य आहार, जीवनसत्वे व सल्ला आवश्यक आहे. लवकर गरोदर कसे राहावे याची संपूर्ण माहिती प्रयेक जोडप्याने जरूर करून घ्यावी.
गर्भधारणा आणि आयुर्वेद याविषयी अधिक जाणून घ्या.
आयुर्वेद तज्ञ डॉ. विनेश नगरे यांची ही मुलाखत पहा. सर्व नवीन व्हिडिओजची माहिती मिळविण्यासाठी खालील यूट्यूब बटणवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
Subscribe
Looking for Treatment? Book Your Appointment Here.