fbpx

पीसीओडी – लक्षणे आणि घरगुती आयुर्वेदिक उपचार

पीसीओडी – लक्षणे आणि घरगुती आयुर्वेदिक उपचार

 

पीसीओडी म्हणजे काय?

सातत्याने बीजनिर्मिती होत राहणे म्हणजे स्त्रीत्व आणि पीसीओडी मध्ये स्त्री या स्त्रीत्वालाच मुकते. १४ ते ५० या वयात स्त्रीची प्रजनन संस्था मुख्यतः बीजनिर्मितीचं काम करीत असते. ही स्त्रीबीज निर्माण होण्याची क्षमता जेव्हा कमी होते तेव्हा पीसीओडी असल्यास निदान होते. पीसीओडी मध्ये बीजनिर्मिती प्रक्रिया पूर्ण होत नाही. असं वारंवार झालं की ती बीजांडं साठून राहतात. अशी बीजांडं साठलेला बिअंडकोष म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी.

मासिक पाळी नियमित असेपर्यंत शरीराला आवश्यक असलेली हार्मोन्स सुरळीत निर्माण होत असतात. पित्त – वात – कफ संतुलित राहून सौंदर्य छान राहतं. पीसीओडी मुळे हे शारीरिक संतुलन बिघडून स्त्रीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. चुकीची जीवनशैली, आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे आधुनिक काळात दर दहा मुलींपैकी चार मुलींना पीसीओडी ही समस्या भेडसावते आहे.

 

पीसीओडीची प्रमुख लक्षणे

 • मासिक पाळी अनियमित होते
 • त्वचा काळवंडते, पिंपल्स, मुरुमे येतात
 • वजन वाढते
 • डोक्यावरचे केस गळतात, पांढरे होतात
 • अनावश्यक केसांची लव वाढते
 • चिडचिड, कंटाळा, नैराश्य वाढते

पीसीओडी

पीसीओडी वर हमखास लागू पडणारे काही घरगुती आयुर्वेदिक उपाय

पीसीओडी, त्याची लक्षणे, कारणे व परिणाम समूळ नष्ट करण्यासाठी विविध प्रकारचे आयुर्वेदिक उपचार आहेत. त्यापैकी काही इथे देत आहोत.

 • अनियमित मासिक पाळीसाठी, तीळ हे उष्ण, स्निग्ध व लोहयुक्त असतात. काळे तीळ एक चमचा घेऊन त्याचा दोन कप पाण्यात काढा करायचा. ते पाणी उकळवून त्यात गूळ टाकून ते प्यायचं. यामुळे रक्त मोकळं होतं. असं सलग चार ते पाच दिवस केल्याने पाळी येऊ शकते.
 • कोरफडीचा गर रोज एक चमचा गरम पाण्याबरोबर सलग दहा दिवस घेतल्यास उत्तम परिणाम जाणवतो. कोरफडीला कुमारी म्हणतात कारण कुमारिका मुलींमध्ये पाळीच्या तात्कालिक तक्रारींवर ती उपयुक्त ठरते.
 • हळीवाची खीर हाही एक प्रभावी उपाय. एक छोटा चमचा हळीव रात्री झोपताना भिजत घालायचे. सकाळी उठल्यावर त्याची खीर करून सलग दोन ते तीन महिने घ्यायची. यातून स्त्री बीजाला प्रेरक असे घटक मिळतात. त्यामुळे ओव्ह्युलेशन चांगलं होऊन पाळी नियमित यायला लागते.
 • पाळीच्या आधी पोटदुखी फार नसेल तर हिंग तव्यावर परतून गरम करावा व गरम पाण्याबरोबर घ्यावा, त्यानेही वेदना कमी होतात.
 • पाळीच्या आधी पोटदुख व त्यामुळे पाळी येत  नसेल,तर पाळीच्या आधी एक चमचा एरंडेल तेल रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर घ्या. यामुळे पॉट साफ होतं, वाताचं शमन होऊन पाळी यायला मदत होते.
 • पीसीओडी मुळे चेहऱ्यावर वांग येत असतील तर जायफळ उगाळून त्याचा पातळ लेप करून लावा. तो सुटेपर्यंत ठेवा व धुवून टाका. असे सात ते आठ दिवस करू शकता.
 • पीसीओडी मुळे गर्भाशयातलं अस्तर नीट न राहणं ही खरंच एक प्रमुख समस्या आहे. यात एक तर, अविवाहित मुलींमध्ये पाळी आल्यावरही अतिशय कमी रक्त जातं. पोटात खूप दुखतं. दुसरं, विवाहित असूनही रक्त कमी जातं,पर्यंत करूनही गर्भधारणा होत नाही. या बाबतीत, मांसाचं हायड्रेशन म्हणजेच पाण्याचं प्रमाण नीट राहिलं पाहिजे. ही शुष्कता टाळण्यासाठी मांस धातू प्रधान आहार पाहिजे. शतावरी, खारीक, खजूर, तर रसप्रधान म्हणजे मांस रस, फळांचे रस, डाळींचे रस, सूप्स, दूध, तूप यांचा फायदा होतो. शतावरी मेंदूवर, गर्भाशयावर काम करते. गुळवेलीच्या काढ्याचा फायदा होतो. यामुळे अडकलेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन रक्तप्रवाह सुधारतो.
 • स्त्रीबीजाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळेवर झोप, वेळेवर उठणे, चांगला व्यायाम, वेळेवर जेवण आवश्यक आहे. यामुळे अग्नी चांगला प्रज्वलित होईल.
 • बीजनिर्मिती चांगली होण्यासाठी शरीराची रुक्षता कमी व्हायला हवी. यासाठी साजूक गाईचं तूप दोन दोन चमचे रोज खायला हवे.
 • पीसीओडी मध्ये जास्त रक्तस्त्राव होत असेलतर दुर्वा स्वच्छ धुवून त्यांचा मिक्सरमधून रस काढून, एक ते दोन चमचे, सकाळ संध्याकाळ खडीसाखरेबरोबर घेतला तर रक्तस्त्राव कमी व्हायला मदत होते. लाल जास्वंदाचं फूल आणि खडीसाखर खाल्ल्यासही फायदा होतो. तांदुळाचं धुवण केल्यास त्याचाही उत्तम लाभ मिळतो. धुतलेले तांदूळ कुटून त्यावर पाणी टाकल्यास त्याचा साका सुटतो. ते पाणी रोज थोडं घेत गेल्यास पांढरा स्त्राव आणि रक्तस्त्राव दोन्ही कमी होण्यास मदत होते.
 • चिंता किंवा ताणतणावामुळे रक्तस्त्राव जास्त होत असल्यास ब्राम्ही किंवा जटामासी या वनौषधी गुणकारी ठरतात. ब्राह्मीप्राश किंवा जटामासीचं चूर्ण मिळतं ते घ्यावं.

आपल्या आजूबाजूला असलेल्या या आयुर्वेदिक औषधींच्या उपचारांमुळे लक्षणे कमी होतात, पाळी नियमित यायला लागते. गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते. संपूर्ण जीवनशैली व्यवस्थित ठेवलीत तर उपचारांचा परिणाम अधिक उत्तम दिसतो. आयुर्वेद हे रोगाच्या मूळ कारणापर्यंत जाऊन ते नष्ट करणारे शास्त्र आहे. याच्या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नसतात व चांगले परिणाम दीर्घकाळ टिकतात. पीसीओडी वर घरगुती उपचार करून स्त्रियांनी स्वास्थ मिळवावे व या विकाराला दूर करून मातृत्त्वाचा व आरोग्याचा आनंद मिळवावा.

 

Know More About Home Remedies for PCOD

Watch Dr Vinesh Nagare’s exclusive interview. To get updates about all the new videos, subscribe to our YouTube channel by clicking on YouTube button below.

Subscribe

 

About SMV Ayurveda

Shri Maulivishwa Ayurveda Research Center is dedicated to research in Ayurveda for women’s health. Vaidya Vinesh Nagare, who is a gynecologist, specializes in Ayurvedic Treatment for Infertility, PCOD/PCOS and other menstrual problems of women.

Get in Touch

Facebook

Youtube Subscribe

Latest Blogs

Categories

Are you looking for appointment?