पंचकर्म : वंध्यत्वावरील एक रामबाण उपाय

पंचकर्म

आयुर्वेदात अपत्यप्राप्तीसाठी अनेक उपचार असून प्रामुख्याने उत्तरबस्ती या पंचकर्म प्रक्रियेचा अतिशय फायदा होतो. पंचकर्म चिकित्सा ही सद्य फलदायी म्हणजे लवकर फळ देणारी अशी चिकित्सा आहे. ज्या ज्या रुग्णाला, ज्या ज्या प्रकारचं पंचकर्म करणं शक्य आहे ते त्याने करून घेतलं पाहिजे. याचं कारण म्हणजे, मासिक पाळी व्यवस्थित असली, क्षेत्र म्हणजे- योनीभाग, गर्भाशयमुख, योनीभाग आणि बीजवाहिनी नलिका यांचं प्राकृत असणं, पाणी व बीजनिर्मिती हे चारही घटक उत्तम जमतात तेव्हाच उत्तम गर्भधारणा होते. या चारही घटकांच्या दोषांचा विचार करून त्यानुसार पंचकर्म करावे लागते.

पंचकर्म म्हणजे नक्की काय?

पंचकर्म

पंचकर्म ही शोधन चिकित्सा आहे. शरीर हे सात धातुमय आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र. प्रत्येक धातूमध्ये आहाराचं पचन होत जातं व ही प्रक्रिया शुक्रापर्यंत येऊन शुक्रातू बीज तयार होतं. शुक्राचा सौम्य गुणधर्म पुरूषांमध्ये टिकायला पाहिजे, तर स्त्रियांमध्ये अग्नी टिकला पाहिजे. शरीरातील विविध अडथळे, सूज यामुळे शरीरातील बारीक रक्तवाहिन्या संकुचित होतात. रक्तपुरवठा कमी होतो. पंचकर्माने शरीर मोकळं होतं. पाच विविध कर्मं म्हणजे

 • नस्य
 • रक्तमोक्षण
 • वमन
 • विरेचन
 • बस्ती

पंचकर्माचा फायदा काय होतो?

पंचकर्म

आहार, दिनचर्या, व्यायाम व पंचकर्म चिकित्सा यांचा एकत्रित परिणाम दिसतो. पंचकर्मामुळे शरीर मोकळं होऊन सर्व घटक त्या त्या मार्गाने पुढे जायला लागतात.  रसांचा पुनर्भरण शरीर केलं जातं. गर्भाशयाच्या अस्तराचं पोषण होतं. रसप्रधान, रक्तप्रधान शरीर तयार होऊन सक्षमता यायला लागते. गरज पडली तर सामान्य चिकित्सा, रसायन चिकित्सा, बृहन चिकित्सा, सुवर्ण भस्म  चिकित्सा असे पुढचे उपचार करता येतात. पंचकर्मामुळे शरीरात औषध लवकर काम करायला लागतं. त्या त्या रुग्णानुसार याची निवड केली जाते.

वन्ध्यत्वासाठी पंचकर्मात ऋतूनुसार काही वेगळे फायदे आहेत का?

पावसाळ्यात बस्ती करणं चांगलं. शरद ऋतूत पित्ताचं प्राधान्य असतं तेव्हा विरेचन करून घ्यावं. थंडीत कफ जास्त साठायला लागला तर वमन करून घ्यावं. वमन म्हणजे उलटीचं औषध, विरेचन म्हणजे जुलाबाचे औषध तर बस्ती म्हणजे एनिमा देणे. वंध्यत्वाच्या कारणानुसार हे उपचार करता येतात.

पुरुष वंध्यत्वात पंचकर्म चिकित्सेचा कसा फायदा होतो?

पंचकर्मस्त्री मध्ये एकच स्त्रीबीज तयार होतं. पुरुषांमध्ये लाखोंनी शुक्राणू तयार होतात. त्यातलं एखादंच बीज ताकदवान असतं ते पोचतं. पुरुषांमध्ये संख्या आणि क्षमता दोन्हीही मोजल्या जातात. यासाठी मूळ शरीर सक्षम आहे का हे पाहायला पाहिजे. ही क्षमता वाढण्यासाठी पंचकर्माचा उपयोग होतो.  विश्रांती,तणावमुक्तता, व्यसनमुक्तता हवी. अंडाशयाकडे जाणारी रक्तवाहिनी सुजायला लागली तर रक्तपुरवठा कमी होतो. यासाठी उपयुक्त असं विरेचन हे पुरुषांमध्ये प्रमुख पंचकर्म मानलं जातं. अपक्व अन्न यातून बाहेर पडतं. अतिरिक्त उष्णता बाहेर पडते.

पुरुषांसाठी योग्य पंचकर्म उपचार

 • विरेचन
 • बस्ती
 • उत्तरबस्ती
 • शिरोधारा
 • सर्वागधारा

स्त्री वंध्यत्वामध्ये पंचकर्माचा कसा फायदा होतो?

 

 • योनीभागाचा कोणताही संसर्ग असता कामा नये. तो भाग नेहमी स्वच्छ ठेवावा लागतो. अशा वेळी योनीधावन हा उपचार अतिशय उपयोगी पडतो. त्रिफळा पाथ, पंचवर्धन पाथ वापरून तो घरीही करता येतो. योनीभागाचं शैथिल्य कमी होऊन तिथल्या स्नायूंना घट्टपणा, सुकुमारा येण्यासाठीही याचा उपयोग होतो. शतावरीच्या काढ्याची धाराही तेथे करता येते.
 • विष्णू तेलाचा पिचू केल्याने पांढरा स्त्राव कमी होतो. हे तेल वर झिरपत थेट बीजांडकोशापर्यंत जाऊ शकतं. ओव्यूलेशन होण्यासाठी याचा उपयोग होतो.
 • स्त्री वंध्यत्वात गर्भाशयाला स्थिरता येण्यासाठी बस्तीचा खास फायदा होतो. स्नेहन व स्वेदन म्हणजे तेलाने मसाज केल्यानेही उत्तम परिणाम दिसतात. त्यानंतर मात्राबस्ती घ्यावी.
 • शोधन चिकित्सा म्हणजे शरीर स्वच्छता. शमन चिकित्सा म्हणजे शरीर शांत करणारी बस्ती. ट्यूबल ब्लॉक्स, एन्डोमेट्रिओसिस, ट्युबरक्युलर एन्डोमेट्रिओसिस यांमध्ये याचा जास्त वापर होतो.
 • त्यानंतर बृहन बस्ती व रसायनचिकित्सा. बस्तीमुळे मोठ्या प्रमाणात औषध शरीरात जातं, ते पचतं, मलभाग निघून जाऊन शरीर शांत होतं व फायदा दिसायला लागतो.

स्त्रियांचे पंचकर्म उपचार

 • बाह्ययोनी- परिषेक, धावन, धूपन, पिचू
 • आंतर्योनी, गर्भाशय – उत्तरबस्ती
 • सार्वदेहिक – प्रजास्थापन बस्ती, योगबस्ती, मात्राबस्ती

उत्तरबस्तीचं महत्व काय?

उत्तरबस्ती म्हणजे गर्भाशयात थेट औषधाचं रोपण करणे. सर्व साधने व ते तेल व तूप देखील निर्जंतुक करून घ्यायला लागते. ते जखम भरून काढण्याचे काम करते.

उत्तरबस्तीत वापरण्याची औषधे

 • क्षार तेल
 • बला तेल
 • कासीसादी तेल
 • जीवनीय तेल
 • फल घृत
 • काश्मिरी कुटज घृत

निसर्गाला पंचकर्माची जोड दिली तर शरीर सक्षम होऊन लवकर गर्भधारणा होते. श्री माऊली विश्व आयुर्वेद येथे वैद्य श्री. विनेश नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म चिकित्सा केली जाते.

वंध्यत्व आणि पंचकर्म याविषयी अधिक जाणून घ्या.

आयुर्वेद तज्ञ डॉ. विनेश नगरे यांची ही मुलाखत पहा. सर्व नवीन व्हिडिओजची माहिती मिळविण्यासाठी खालील यूट्यूब बटणवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.

Subscribe

Looking for Infertility Treatment? Book Your Appointment Here.