दिनचर्या या संकल्पनेचं आयुर्वेदातील महत्व काय?
वंध्यत्वामध्ये असं म्हणतात की, शुक्रम् सौम्यम् आर्तव आग्नेयम. म्हणजे पुरुषाचे शुक्राणू हे सौम्य स्वरूपाचे,तर स्त्रीबीज हे अग्नीस्वरूप असते. म्हणून वंध्यत्वाच्या रुग्णाची दिनचर्या तपासून वाट- पित्त -कफ दोषांचे संतुलन नीट करावे लागते. दिनचर्या योग्य आखून औषधाशिवायही उत्तम रिझल्ट्स मिळविता येतात. प्रक्रिया योग्य वेळी, योग्य प्रमाणात घडायला लागतात व गर्भधारणा घडायला मदत होते. धातूचं पोषण योग्य झालं तरच त्यातून नव्या जिवाची निर्मिती होऊ शकते. यासाठीच दिनचर्या इतकी महत्वाची आहे.
दिनचर्या म्हणजे काय?
आपण ज्या पध्द्तीने जगतो त्याचा परिणाम शरीरावर नेहमीच होत असतो. आपण उठतो कधी, झोपतो कधी, झोप लागते की नाही, स्वप्न पडतात की नाही, खातो कधी, काय खातो या सगळ्याचा विचार दिनचर्येत होतो. दिनचर्या नीट असेल तर दैनंदिन आरोग्यातल्या बऱ्याच गोष्टी सुधारतात व नीट पुढे जातात. आयुर्वेदामध्ये म्हणतात की, व्याधी होण्याचं कारण म्हणजे – अति प्रवृत्ती संगो वा विमार्ग गमनं चापि – म्हणजे एखाद्या प्रक्रियेचा अतिरेक झाला, प्रक्रिया अडकून राहिली आणि प्रक्रिया चुकीच्या दिशेने गेली तर व्याधी निर्माण होतात.
व्याधीवर तीन दोष नियंत्रण ठेवतात.
- वात- हालचाली घडविणारा, प्रक्रिया टिकवून धरणारा
- पित्त- प्रक्रियेसाठी लागणारी ऊर्जा देणारा
- कफ- संघटन बांधणारा, पोषण देणारा
यातील वात हा अत्यन्त महत्वाचा असून, तो पुरेसा कोरडा, योग्य ती कृती करणारा हवा. अन्यथा अनेक व्याधी जडतात.
झोपण्याचे प्रमाण व वंध्यत्व
आयुर्वेदानुसार, आपण सूर्यचक्रानुसार जगतो. निद्रेवर आपलं सुख, दुःख व हित अवलंबून आहे. नैसर्गिक घड्याळ योग्य हवे. विषारी द्रव्य बाहेर टाकण्याची प्रक्रिया रात्री होत असते, त्यामुळे जागरण केल्यास ती प्रक्रिया होत नाही. विषारी द्रव्य साठून राहिली तर बीजनिर्मितीचे सर्वोत्तम कार्य होत नाही. त्यामुळे योग्य प्रमाणात व योग्य वेळेला झोप घ्यायला हवी. ब्राहमेमुहूर्ते उत्तिष्ठे म्हणजे सकाळी ७ च्या आत पहिल्या प्रहरी आपण उठायला हवे. ऊर्जा घ्यायला आपण तयार असलो तरच शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालणार.
सकाळी लवकर का उठावे?
आयुर्वेदात सकाळी लवकर उठण्याला खास स्थान आहे. त्यामुळे शरीर व्यवस्थित कार्यरत राहून क्षमता वाढते. सकाळी लवकर उठलं की
- पोट चांगलं साफ होतं
- पुढची भूक छान लागते
- खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचतं
- मेंदू ताजातवाना होतो व शरीराला योग्य संदेश देतो
गर्भधारणेसाठी आयुर्वेदातील सूचना
- गर्भाशयाची ताकद कमी असेल तर शतावरी कल्प नियमितपणे घ्या.
- पीसीओएस म्हणजे अतिप्रवृत्ती असल्यास बीजनिर्मिती होत नसल्याचे मूळ कारण शोधणे आवश्यक ठरते. दिनचर्येनुसार विचार करून, धातूचिकीत्सेनुसार उपचार व्हायला हवेत.
- मनावरील ताण कमी करा, त्यामुळे शरीर मोकळे होऊन उत्तम परिणाम दिसतील
- खाण्यापिण्याच्या वेळा पाळणे महत्वाचे आहे. आपली वेळ ठरवून त्या वेळी खाऊन घ्यायचे.
- पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या वाढण्यासाठी पुरेशी झोप अत्यन्त आवश्यक आहे. झोप व जेवण यांचे संतुलन असेल तर निरोगी व भरपूर शुक्राणू निर्माण होऊन गर्भधारणा लवकर होते.
- नुसत्या औषधाने काही होता नाही, डॉक्टरांनी सांगितलेली दिनचर्या पाळली तरच गुण येतो.
- मेद जास्त साठला की शुक्रापर्यंत पोषण जातच नाही. त्यामुळे बीजनिर्मिती चांगली होत नाही. गर्भाशयाचे अस्तर नीट तयार होत नाही. गर्भ नीट रुजत नाही. यासाठी सम्पूर्ण धातूचिकीत्सा करून उपचार घ्यायला हवेत.
- बाहेर पडणाऱ्या मल-मूत्र-वायूचा वेग थांबवून धरू नये. यामुळे तिथल्या स्नायूंचा टोन कमी होतो. लघवीचा जन्तुसंसर्ग होतो. हे दुखणे गर्भाशयापर्यंत जाऊ शकते. मणक्यावरही परिणाम होतो.
- तहान भूक निद्रा रोखून धरू नये. शरीराची टवटवी,आर्द्रता कायम ठेवण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी प्यावे. अती पाणी पिण्याने सूज येते, भूक कमी होते. दीड लिटर पाणी पिऊन बाकीचे पाणी दूध, तूप, ताक, आमटी यातून यावं.
आहारातील संतुलन कसं ठेवाल?
आहार-विहार-विचार म्हणजेच दिनचर्या. समतोल आहार हा उत्तम दिनचर्येचा अविभाज्य भाग आहे. वंध्यत्व टाळण्यासाठी आहारात सर्व पोषक घटकांचे संतुलन योग्य असावे.
- अती मीठ खाऊ नका. यामुळे शुक्र धातूचा नाश होतो. लोणचं, पापड, फरसाण, वरून मीठ घेणे थांबवावे.
- पालेभाज्यांमध्ये चुका, चाकवत,माठ, राजगिरा या वातशमन करणाऱ्या भाज्या खाव्यात. विविध रंगीत फळभाज्या भरपूर खाव्यात.
- मिश्री, तंबाखू,सिगरेट इत्यादी व्यसने केल्यास रक्तवाहिन्या कठीण होतात, सूक्ष्म रक्तवाहिन्या तर ब्लॉकच होतात. त्यामुळे गर्भाशय व अंडकोशापर्यंत रक्त पोचत नाही. ही वयाने स्त्री व पुरुष दोघांनी टाळायला हवीत.
अशा प्रकारे आयुर्वेदाच्या मदतीने दिनचर्या योग्य राखल्यास वंध्यत्वावर मात करता येते. पालकत्वाचा आनन्द घेता येतो. एसएमव्ही आयुर्वेद येथे वैद्य डॉ. विनेश नगरे यांच्या मार्गदर्शनाने दिनचर्येतील बदलाने अनेकांना अपत्यप्राप्तीचा नैसर्गिक आनंद मिळालेला आहे.
दिनचर्या आणि वंध्यत्व याविषयी अधिक जाणून घ्या.
आयुर्वेद तज्ञ डॉ. विनेश नगरे यांची ही मुलाखत पहा. सर्व नवीन व्हिडिओजची माहिती मिळविण्यासाठी खालील यूट्यूब बटणवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
Subscribe