गर्भधारणा, गर्भसंस्कार आणि आयुर्वेद
गर्भधारणा झाल्यानंतर करावयाचा गर्भसंस्कार हा सनातन सोळा संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार आहे. आयुर्वेदिक चिकित्सेनुसार गर्भस्थ अर्भक शिशू हा एखाद्या चैतन्य जीवाप्रमाणे असतो . तो कानाने ऐकतो, ज्ञान सुद्धा ग्रहण करतो. निरोगी बाळ जन्माला येण्यासाठी योग्य वेळी निरोगी शरीरात गर्भधारणा होणे व योग्य संस्कारांनी गर्भाचे पोषण होणे आवश्यक आहे.
गर्भधारणा न होण्याची कारणे
गर्भधारणेच्या वेळी विवाहित जोडप्याचे वय लक्षात घेणेही आवश्यक आहे. वय जसजसं वाढत जातं तसं वातप्रधानता वाढते. कोरडेपणा वाढतो. पहिलटकरीण स्त्री जर तीस वयाच्या पुढे असेल तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. पाचव्या महिन्यात नाळ म्हणजेच प्लॅसेंटा तयार होताना त्यात सुकुमारता राहत नाही. प्रयत्न करूनही गर्भ राहत नसेल तर खालील गर्भाशय दोष आहेत का ते तपासायला हवे.
- अस्तर चिकटलेले असणे
- अस्तर अपुरे तयार होणे
- गर्भाशयाची सूज
- गर्भाशयातील गाठी
- गर्भाशय शैथिल्य
निराशा अथवा ताणतणाव जास्त असेल तर मन व शरीर सुकल्यासारखे होते, बारीक रक्तवाहिन्या नीट काम करीत नाहीत. ताण घालवणं, मनाला मोकळं करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार व जीवनशैली यांचा मिलाफ केल्यास उत्तम गर्भधारणा होण्यास मदत होते. गर्भधारणेसाठी पाळी निमित्त असणं आवश्यक आहे.
अनियमित मासिक पाळीची कारणे
- रक्ताची अल्पता – शरीरामध्ये रक्त कमी असेल तर पोषणाचा अभाव
- विविध शारीरिक आजार
- पॉलिसिटिक ओव्हरी सिन्ड्रोम (पीसीओडी)
- एंडोमेट्रिओसिस – गर्भाशयाच्या अस्तराला येणारी सूज
- थायरॉईड समस्या
- कावीळ, टीबी
मासिक पाळी अनियमित असेल तर गर्भधारणा होत नाही. यासाठी बीजनिर्मिती वेळेत होण्याचे आयुर्वेदिक उपचार घ्यायला हवेत.
पाळी नियमित येण्यासाठीचे आयुर्वेदिक उपचार
शरीरातील, पाळी ज्यामुळे बंद किंवा अनियमित झाली त्या विकृती शोधून त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक चिकित्सा व उपचार:
- पिचू
- उत्तर बस्ती
- धावन
- रसधातुप्रधान आहार
- रसधातुप्रधान औषधे व चिकित्सा
- रस, रक्त मांस या धातूंचे पोषण
गर्भाशय मुखाचे दोष कोणते?
गर्भाशय मुखामधून पुरुष बीजाचा प्रवेश होत असल्याने व गर्भाशय मुखच गर्भाला धरून ठेवत असल्याने, गर्भाशय मुख निरोगी हवे. गर्भाशय मुखाच्या समस्यामुळे शूक्राणू वर जात नाहीत व गर्भधारणा होत नाही. गर्भाशय मुखाचे खालील दोष उपचाराने दूर करायला हवेत.
- गर्भाशय मुख संकोच
- बहिर्वक्र गर्भाशय मुख
- नेबोथियन सिस्ट्स
- सर्व्हीकल पॉलीप्स
- गर्भाशय मुखाचे अलसर्स
- लहान गर्भाशय मुख
आयुर्वेदिक योनी पिचूचे फायदे
योनी पिचू दिला तर त्याचे फायदे योनी व गर्भधारणेशी संबंधित सर्वच अवयवांसाठी अत्यंत मोलाचे आहेत.
- योनी पिचू योनीभागाला दुरुस्त करतो
- गर्भाशय मुखाचं काठिण्य घालवतो
- गर्भाशयाला दुरुस्त करतो
- बीजवाहिनी नलिकेला दुरुस्त करतो
- पिचूतील औषध थेट अंडाशयापर्यंत जाऊन परिणाम साधतं
गर्भसंस्कार म्हणजे काय?
सर्व समस्यांवरील उपचार देता येऊन गर्भाला स्थिरता प्राप्त करून देणं म्हणजे गर्भसंस्कार.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जर हवी असतील तर, गर्भधारणेनंतर गर्भसंस्कार असा विचार न करता, गर्भसंस्काराच्या आधी बीजसंस्कार असा विचार केला पाहिजे. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात झालेली गर्भधारणा सर्वात उत्तम असते, कारण त्या वेळेला स्त्रीबीजाची उत्पत्ती करणारा अग्नी व जठराग्नी अतिशय उत्तम असतो. त्यानुसार आहार व आरोग्याचे नियोजन करत पुढे जायला हवं.
आयुर्वेदानुसार गर्भसंस्कारांचे टप्पे कोणते?
आयुर्वेदानुसार उत्तम संतती प्राप्तीसाठी चार गोष्टी व त्यांचा समतोल महत्वाचा आहे. गर्भधारणा करताना, बीज, स्वतःचे शरीर, गर्भाशय या प्रत्येक घटकाचा विचार नीट करायला हवा. पती – पत्नीमध्ये सुसंवाद हवा. जे मूल होईल ते सुदृढ, निरोगी व चांगले व्हावे म्हणून गर्भसंस्कार हे खालील चार टप्प्यांमध्ये केले जातात
- ऋतू (मासिक पाळी )
- क्षेत्र (योनी, गर्भाशय, बीजवाहक नलिका )
- अंबू (रस, रक्त )
- बीज (स्त्री बीज, पुरुष बीज )
गर्भधारणेसाठी आयुर्वेदाची मदत कशी होते?
- आयुर्वेदिक दृष्टीकोनातून प्रजननासाठी सप्तधातूंची चिकित्सा करणं अत्यंत आवश्यक असतं. सूक्ष्म धातू नीट करण्यासाठी पंचकर्म चिकित्सा, औषध चिकित्सा, रसायन चिकित्सा करणं महत्वाचं ठरतं.
- योनी धूपन, योनी धावन यासाठी गुगुळ, वाखरू, त्रिफळाच्या काढ्याचा वापर
- योनी पिचू नऊ प्रकारची औषधं व तेलं वापरून केला जातो.
- योनीपरिषेक: शतावरीच्या सहाय्याने करतात
- गर्भाशय मुख प्रतिसरण
- ओटीपोटावर तेल, स्नेहन, स्वेदन, शेकणे
- शिरोधारा: ताणतणाव कमी करण्यासाठी
- नस्य: नाकात औषध टाकणे
- गुदबस्ती: बस्ती हा आयुर्वेदाचा आहे, ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात
- वमन: अतिरिक्त कफाचा नाश करण्यासाठी
- विरेचन
- उत्तरबस्ती: सर्व उपाय अपुरे ठरल्यास हा रामबाण उपाय थेट गर्भाशयाला ताकद देतो. बीजवाही नलिकेतील अडथळा दूर करतो.
- गर्भाला स्थिरता देण्यासाठी वटांकुराचा रस
- शतावरी वटकल्प देणे
- गर्भधारणेच्या मधल्या काळात गर्भपात होऊ नये म्हणून औषधे व गर्भाची सर्वांगीण औषधे देण्यासाठी औषधे
एसएमव्ही आयुर्वेद मध्ये वैद्य डॉ. विनेश नागरे यांच्या मार्गदर्शन व आयुर्वेदिक उपचारांनी व गर्भसंस्कारांनी अनेक जोडप्यांनी पालकत्व प्राप्त केले आहे. वरील कोणत्याही समस्या असतील तर अवश्य संपर्क साधावा.
Know More About Pregnancy & Ayurveda
Watch Dr Vinesh Nagare’s exclusive interview. To get updates about all the new videos, subscribe to our YouTube channel by clicking on YouTube button below.
Subscribe