fbpx

आयव्हीएफ, वंधत्व आणि आयुर्वेद

आयव्हीएफ, वंधत्व आणि आयुर्वेद

 

आयव्हीएफ म्हणजे काय? 

दांपत्याला मूल होत नसतं आणि ते व्हावं अशी आत्यंतिक इच्छा असते तेव्हा आयव्हीएफचा पर्याय निवडला जातो. गर्भधारणेला पोषक परिस्थिती नसल्याने स्त्रीला मूल होण्यात अडथळा येतो. अश्या वेळेस ती पोषक परिस्थिती बाहेर निर्माण केली जाते.  

शरीराच्या बाहेर प्रयोगशाळेमध्ये तंतोतंत बीजवाहिनी नलिकेसारखं वातावरण तयार करून स्त्री व पुरुष बीज एकत्र आणलं जातं. यातून तयार झालेल्या गर्भाचं स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केलं जातं. या प्रक्रियेला आयव्हीएफ म्हणजेच इन व्हिट्रो फर्टिलायझेशन असे म्हणतात. गर्भधारणा न होण्याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे: 

आयव्हीएफ

 

एंडिमेट्रिऑसिस 

बीज रुजवण्यासाठी गर्भाशयामध्ये अस्तर तयार असणं महत्वाचं असतं. एंडिओमेट्री म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या अस्तराला सूज आली तर ती पुढे सरकत गर्भाशयमुख, बीजवाहिनी नलिका, अंडाशयापर्यंत पोहोचते. त्यामुळे बीजनिर्मिती प्रक्रिया नीट होत नाही. पुढे मूत्राशय, गुदाशयापर्यंत सूज जाऊन पोटातील सर्व वातावरण दूषित होतं. आयुर्वेददृष्ट्या एंडिओमेट्री म्हणजे पुटकुळ्या, फोड जे लॅप्रोस्कोपी मध्ये गर्भाशयावर दिसून येतात.  

 

अकार्यक्षम शुक्राणू

पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या किंवा क्षमता कमीकमी असणे हेही वंध्यत्वाचं प्रमुख कारण आहे. आयुर्वेदातील सुश्रुताचार्यांनी शुक्राणूंसाठी औषधें सांगितली आहेत. तंबाखुजन्य व्यसने, अति जागरण, अति मीठ खाणे, अति उष्ण आहार अश्या दोषांमुळे शक्राणुंची बीजनलिकेतून पुढे जाण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे त्यांची संख्या रोडावते किंवा ते ठार होतात. स्त्रीच्या सर्व्हायकल म्युकस मध्ये जे स्त्राव असतात त्यांच्यावर मात करून पुढे जाण्यासाठी जे उत्तम तत्व लागतं ते शुक्राणूंमध्ये नसतं.  

 

वंध्यत्वाची इतर कारणं  

  • उशिरा वयात येणे  
  • फलन न होणे  
  • वारंवार गर्भपात होणे  
  • धातुक्षय  
  • मृत मूल जन्माला येणे  
  • पीसीओडी

आयव्हीएफचे दुष्परिणाम

गर्भधारणा न झाल्यास आयव्हीएफचे रुग्ण अतिशय निराशापोटी घाईघाईत निर्णय घेतात. आग्रहाला बळी पडतात. आयव्हीएफसाठी दोन तीन ओपिनियन्स घेणं अतिशय महत्वाचं आहे. आयव्हीएफच्या पेशंटला ५ ते ६ महिने पाळी न येऊ देण्यासाठी इंजेकशन दिलं जातं. मात्र आयव्हीएफ करूनही खूप वेळा गर्भधारणा होत नाही. याचे व प्रत्यक्ष आयव्हीएफही दुष्परिणाम अनेक आहेत.

  • एकापेक्षा अधिक गर्भ राहणे
  • मुदतपूर्व किंवा कमी वजनाचे बाळ होणे
  • फर्टिलिटी ड्रग्जचे शरीरावर दुष्परिणाम होणे
  • अतिरिक्त स्टिम्युलेशन मुळे स्त्रीबीजावर किंवा स्त्रीच्या प्रकृतीवर परिणाम होणे
  • एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे पोटात किंवा बीजनलिकेत गर्भ राहणे
  • स्त्रीचे डोके दुखणे व तब्येतीवरचे इतर दुष्परिणाम
  • पुन्हापुन्हा आयव्हीएफ करावे लागल्यास येणारा ताण व नैराश्य

आयुर्वेद, आयव्हीएफला पर्याय

आयव्हीएफ साठी भरपूर प्रयत्न करूनही मूळ न झाल्याने आयुर्वेदाकडे वळवणारे रुग्ण आहेत, तसंच आयुर्वेदावर ठाम विश्वास ठेवून नियमित उपचार घेऊन यशस्वीरीत्या गर्भधारणा झालेलेही आहेत.

  • गर्भनलिका ब्लॉक झाल्यास आयुर्वेदिक उपचार करू शकतो. यासाठी मांसधातू आखडलेपणा कमी करण्यासाठी रस आणि धातू दोन्हींचा विचार करायला लागतो. पिचू, हवन, धुपन यांचा उपयोग होऊ शकतो. नलिका ब्लॉक होण्याचं मुख्य कारण समजून त्यावर उपचार होणे आवश्यक आहे.
  • ओव्ह्युलेशन व स्त्रीबीजाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आयुर्वेदात रसायन उपचार व पंचकर्म लाभदायी असल्याचे सांगितले आहे. प्रकृती व नाडी तपासून त्यानंतर रसायन उपचार सांगितले जातात.
  • शरीरातील विषारी पदार्थ दूर करण्यासाठी वमन, विरेचन, बस्ती, उत्तरबस्ती व शिरोधारा यांचा समावेश असलेले पंचकर्म उपचार अत्यंत उपयुक्त ठरतात. यामुळे पाळी नियमित होण्यास मदत होते.
  • न्यास उपचार, योनीप्रक्षालन, पुनसावन विधी, धातू चिकित्सा, रसायन चिकित्सा
  • सात्विक आहार, फळे, सुका मेवा, ऋतूनुसार भाज्या, प्रथिने, लोह, कॅल्शियम युक्त आहार
  • नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम  

 

याशिवाय इतर काळजी घेण्यासाठी

  • तंबाखूजन्य आहार कमी करणे  
  • व्यसनं कमी करणे  
  • उष्ण आहार कमी करणे  
  • अति मीठ न खाणे  
  • जागरणं कमी करणे  
  • नियमित व्यायाम करणे  
  • ताण कमी करणे

या आयुर्वेदिक उपचारांमुळे व जीवनशैलीत बदल केल्याने शरीराची शुद्धता होते, संतुलन शहूधर्ते, चयापचय प्रक्रिया व्यवस्तीत सुरु होते, बीजाची क्षमता सुधारते, गर्भाशयाचे अस्तर योग्य प्रकारे तयार होऊ लागते. दांपत्याने एकत्रितपणे आयुर्वेददक उपचार घ्यावेत, तणावमुक्त जागून सकस खावे, व्यायाम करावा. कोणतेही दुष्परिणाम नसलेले व मानसिक शांतता देणारे खालील आयुर्वेदिक उपचार नैसर्गिक गर्भधारणेला मदत करतील व दांपत्याचे पालकत्वाच स्वप्न साकार होईल.

Watch Dr Vinesh Nagare’s exclusive interview. To get updates about all the new videos, subscribe to our YouTube channel by clicking on YouTube button below.

Subscribe

 

About SMV Ayurveda

Shri Maulivishwa Ayurveda Research Center is dedicated to research in Ayurveda for women’s health. Vaidya Vinesh Nagare, who is a gynecologist, specializes in Ayurvedic Treatment for Infertility, PCOD/PCOS and other menstrual problems of women.

Get in Touch

Facebook

Youtube Subscribe

Latest Blogs

Categories

Are you looking for appointment?