वंध्यत्व येण्याचे प्रमुख कारण म्हणजे पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. पीसीओडी सध्या मोठ्या प्रमाणात अगदी टीनेजर्स मध्येही आढळतो. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम पुरुत्पादन संस्थेला भोगावा लागतो.
मासिक पाळी न येणे, रक्तस्त्राव कमी जास्त होणे अशी लक्षणं आढळतात. पीसीओडी म्हणजे बीजांडकोषात बीजाच्या गाठी तयार होऊन त्या अडकून पडणे. गाठी साठून बीजनिर्मितीला जागाच उरत नाही तेव्हा लॅप्रोस्कोपी सांगितली जाते. पण शत्रक्रियेनंतरही गाठी होण्याचे थांबत नाही कारण शरीराची सवय तुटलेली नसते. ही सवय तुटली पाहिजे.
पीसीओडी साठी सांगितल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेला आयुर्वेदात काही पर्याय आहेत का?
पीसीओडी वरची शस्त्रक्रिया टाळण्यासाठी आम्ही सखोल संशोधन केलेले असून केवळ औषधाने आम्ही उपचार करतो. आमच्या औषधाने बीजांडकोषाची सूज कमीकमी होत जाते, सिस्ट होण्याची सवय सुटते व मुळापासून केलेल्या उपचाराने बीजांडनिर्मितीची प्रक्रिया पुन्हा सुरू होते. रसापासून शुक्रापर्यंत सर्व धातूंना परिपूर्ण केल्याने बीजांड उत्तम तयार होतं.
पीसीओडी मुळे वंध्यत्व येत असेल तर काय करावे?
बीज चांगलं होणं ही प्रक्रिया एकदोन महिन्याची नाही. संपूर्ण शरीराची शक्ती एकत्र लागून जो अंश जेव्हा एकत्र येतो तेव्हा शुक्रातून बीजनिर्मिती होते. आयुर्वेद यासाठी पूर्ण शरीराचा विचार करून उपचार केले जातात.
एन्डोमेट्रियोसिस साठीच्या लॅप्रोस्कोपी साठी आयुर्वेदात काही पर्याय आहेत का?
एन्डोमेट्रियोसिस मध्ये गर्भाशयाचं अस्तर सुजतं व त्याचा त्रास इतर अवयवांना होतो. ही सूज ट्यूबल ब्लॉक, एन्डोमेट्रियोटिक सिस्ट निर्माण करते, आतड्यांवर सूज निर्माण होते. पोटात वेदना होतात व सर्व वातावरण बिघडते. यामुळे वंध्यत्व येतं.
हे चिकटलेले अवयव दार करण्यासाठी ऍडहीयोलायसिस करतात, पण ते यशस्वी होतंच असं नाही. आयुर्वेदात त्र्यावर्ता सयोनी असा उल्लेख सापडतो. म्हणजे तीन सर्कल्स- पहिलं योनीभाग, दुसरं गर्भाशयमुख, गर्भाशय आणि बीजवाहिनी नलिका आणि तिसरं बीजांडकोष. आयुरवेदानुसार, दर महिन्याला बीज तयार होताना, बीजांडकोषांपर्यंत, गर्भाशयापर्यंत रक्त सहजपणे पोहोचायला हवं.
गर्भाशय हा मांसप्रधान अवयव आहे. तेव्हा मांसधातू, रस, रक्त, वात, पित्त यांचा एकत्रित विचार करावा लागतो. अति चिंतेमुळे रस धातूचा क्षय होतो. रसाने मांसधातूचं, गर्भाशयाच्या अस्तराचं पोषण होतं. मांसधातू, अस्तर सक्षम करण्यासाठी चिंतामुक्त राहणं, मन सुदृढ ठेवणं, जीवनशैली सुधारणं आवश्यक आहे. औषधाबरोबर तुम्ही पंचकर्म, उत्तरबस्ती,पिचू, योनीधावन केलंत तर फायदा होतो. एन्डोमेट्रियोसिस मध्ये सर्वसमावेशक विचार करावा लागतो. तरच उत्तम परिणाम दिसून रुग्ण गरोदर राहतात.
गर्भाशयातील गाठी म्हणजेच फायब्रॉइड्स साठीच्या शस्त्रक्रियेला आयुर्वेदात पर्यायी उपचार कोणते?
गर्भाशयात तीन प्रकारच्या गाठी होतात. एक, बाहेरच्या अस्तरामध्ये, मधल्या स्नायूंच्या अस्तरामध्ये व स्नायूंच्या आतल्या भागामध्ये. या गाठींमुळे रक्तवाहिन्या नियंत्रित होऊ शकत नाहीत. त्यामुळे पाळीत अतिरिक्त रक्तस्त्राव होतो, गर्भाशय गर्भाला टिकवून धरू शकत नाही व गर्भपात होतो.
पाचव्याचा महिन्यात ओसटाईटनिंग म्हणजे टाका घालूनही ही शक्यता असते. यामुळे फायब्रॉईड काढण्याची शस्त्रक्रिया सांगतात. पण, फायब्रॉईड कशामुळे झाला, मांसधातूमध्ये दोष कशामुळे निर्माण झाला हे पाहायला हवे.
ट्यूबल ब्लॉक साठी शस्त्रक्रियेला पर्याय काय?
सर्वप्रथम ट्यूबल ब्लॉक का होतो हे पहावं लागतं. योनीभातातील संसर्गामुळे ट्यूबल ब्लॉक होतो. टी.बी. च्या जंतूमुळे हे होऊ शकतं. एन्डोमेट्रियोसिस मुले ट्यूबल ब्लॉक होऊ शकतो. यासाठी लॅप्रोस्कोपी किंवा कॅन्यूलेशन करून मार्ग काढला जातो.
पण यात सूज कमी करणारी औषधे दिली जात नाहीत. तात्पुरती अँटिबायोटिक दिले जातात. जखम भरून न आल्यास पुन्हा कॅन्यूलेशन करायला सांगतात. त्र्यावर्ता योनीचा विचार करून जर उपचार केले, तर ते ब्लॉक निघून जातात. क्षार तेलाचे पिचू, उत्तरबस्ती हे उपचार केले तर लवचिकता, मऊपणा व सहा ते आठ महिन्यात ट्यूबल ब्लॉक जातो.
ट्यूबल ब्लॉक मुळे जोडपी आयव्हीएफ कडे वळतात, यासाठी दोनतीन वर्षे लागतात. शिवाय ब्लॉक मुले गर्भाशय अस्तराला सूज आली असेल तर गर्भ टिकत नाही. त्यापेक्षा आयुर्वेदिक उपचारांना काही महिने दिले तर ब्लॉक जाऊन नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता वाढते.
आयव्हीआय करूनही गर्भ राहात नसेल तर काय करावे?
आयव्हीआय म्हणजे पुरुषबीज एका कॅन्यूलाने थेट बीजवाहिनी नलिके पर्यंत पोचविणे. पुरुषांमध्ये काही वेळा बीज संख्या कमी असते, मोटिलिटी कमी असते, अशा वेळी आयव्हीआय करण्यापेक्षा किंवा घेण्यापेक्षा आयुर्वेदामध्ये बीजक्षमता वाढविणारी व संख्या वाढविणारी ट्रीटमेन्ट करू शकतो.
सात धातू बलवान झाले की आपोआप तुमचं बीज रसक्षम होतं. स्त्रीबीज अग्नीस्वरूप असतं, पुरुषबीज हे सौम्य असतं. सौम्यता टिकविण्याचे उपचार केले की पुरुषबीज चांगलं होतं. स्त्रियांना जाठराग्नी चान्गला टिकवावा लागतो. मग रसधातूअग्नी उत्तम राहणारी औषधे दिली की लहानमोठे सिस्ट होतच नाहीत.
वंध्यत्वावरील शस्त्रक्रियांना असलेले हे आयुर्वेदिक उपचार एसएमव्ही आयुर्वेद येथे वैद्य डॉ. विनेश नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली होतात.
वंध्यत्व आणि आयुर्वेद याविषयी अधिक जाणून घ्या.
आयुर्वेद तज्ञ डॉ. विनेश नगरे यांची ही मुलाखत पहा. सर्व नवीन व्हिडिओजची माहिती मिळविण्यासाठी खालील यूट्यूब बटणवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
Subscribe