fbpx

मासिक पाळी – स्त्रीच्या जीवनातला एक नैसर्गिक अविष्कार

मासिक पाळी – स्त्रीच्या जीवनातला एक नैसर्गिक अविष्कार

 

मासिक पाळी म्हणजे काय?

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात मासिक पाळीची सुरवात ही एक शारीरिकदृष्ट्या व तितकीच भावनिकदृष्ट्याही महत्वाची अशी घटना आहे. पाळी सुरु होणे ही मुलगी वयात आल्याची प्रजननक्षम झाल्याची खूण. पौगंडावस्थेच्या सुरवातीला साधारणपणे १३ / १४ व्या वर्षी स्त्री जननक्षम बनते.

गर्भधारणेसाठी तयार झालेले गर्भाशयाचे अस्तर व बीजांडकोषामधील फलित न झालेले स्त्रीबीज रक्ताबरोबर शरीराबाहेर टाकले जाण्याची क्रिया म्हणजे मासिक पाळी. ती दरमहा ३ ते ६ दिवस चालते. ४८/४९ व्या वर्षी पाळीचे चक्र थांबते, म्हणजेच रजोनिवृत्ती येते. मासिक पाळी ही एक अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे. पाळीविषयीचे शास्त्रीय ज्ञान व घ्यायची काळजी याचे ज्ञान प्रत्येक मुलीला व स्त्रीला असायला हवे.

मासिक पाळी

मासिक पाळीच्या समस्या

काही स्त्रियांची मासिक पाळी अगदी सहजतेने पार पडते तर काहींना समस्या भेडसावतात. पाळीच्या विविध लहानमोठ्या तक्रारी असतात, काही अगदी किरकोळ तर काही चिकट व दीर्घकाळ भेडसावणाऱ्या. मात्र या तक्रारींचे योग्य निदान व उपचार व्हायला हवेत हे निश्चित.

  • पाळी उशीरा सुरु होणे किंवा सुरूच न होणे.
  • पाळी अनियमित येणे.
  • रक्तस्त्राव अगदी कमी किंवा अती जास्त, दीर्घकाळ असणे.
  • मासिक पाळीच्या वेदना.
  • ओटीपोटात किंवा पायात पेटके येणे
  • ओटीपोटात जंतुसंसर्ग किंवा जळजळणे
  • पाळीपूर्वीच्या शारीरिक किंवा मानसिक समस्या
  • गर्भाशयाच्या अस्तराचा कर्करोग

पाळीच्या समस्यांचे स्त्री आरोग्यावरील परिणाम

पाळी आरामदायी न होता त्रासदायक होऊ लागली की त्या मुलीच्या किंवा स्त्रीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागतात. सर्व वयोगटाच्या स्त्रियांना ते जाणवतात. या दुष्परिणामांच्या मुळापर्यंत जाऊन त्यांच्यावर उपचार व्हायला हवेत. त्या स्त्रीला समजून घेऊन तिला आधार द्यायला हवा. उपचार व व्यवस्थापन हीच या समस्यांवर मात करायची गुरुकिल्ली होय.

  • पाळीच्या काही दिवस आधी चिडचिड, नकारात्मक विचार व निराशा जाणवते
  • पाळीदरम्यान स्वभावात बदल होतो, ताण येतो
  • संप्रेरकांमध्ये बदल होतो, थकवा येतो
  • शरीर जाड वाटते, डोके जड होते किंवा दुखते
  • पाठीत, ओटीपोटात तीव्र वेदना होतात
  • अशक्तपणा येतो
  • समाजात वावरण्याचा आत्मविश्वास कमी होतो
  • सतत झोपून राहावेसे वाटते किंवा रात्री आजिबात झोप येत नाही
  • बद्धकोष्ठाचा  त्रास जाणवतो

मासिक पाळी समस्या

पाळीच्या समस्यांवर काही घरगुती उपचार

पाळीच्या समस्यांवर शास्त्रशुद्ध विचार, निदान व चाचणी करून त्यावर वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे. समस्येचे प्रकार, तीव्रता व कालावधी यावर हे इलाज अवलंबून असतात. डॉक्टरांकडून घेतलेला सल्ला व घरगुती उपचार यांच्या मिलाफातून आराम निश्चितपणे जाणवतो. यापैकी काही उपचार खालीलप्रमाणे –

  • नियमित व शरीराला योग्य असा व्यायाम
  • भाज्या, फळे, सुका मेवा, प्रथिने, कॅल्शियम व ब जीवनसत्त्वयुक्त आहार अथवा पूरक जीवनसत्त्वांच्या गोळ्या
  • वेदनांसाठी विश्रांती व गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे
  • पाळीच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी
  • मसाजचा योग्य वापर
  • योगासने, मेडिटेशन, याद्वारे मानसिक शांतता राखणे

मासिक पाळी व आयुर्वेद

पाळीच्या लहानात लहान समस्येकडेही दुर्लक्ष करू नये असे आयुर्वेद सांगतो. तात्पुरते, वरवरचे किंवा इतर दुष्परिणाम करणारे उपचार आयुर्वेदात नाहीत. भर आहे तो समस्या समूळ नष्ट करण्यावर. पंचकर्म चिकित्सा, नस्य, बस्ती या आयुर्वेद चिकित्सेचे अत्यंत उत्तम परिणाम दिसतात.

मंजिष्ठा चूर्ण, कोरफड, त्रिफळा चूर्ण, आवळा, दशमूलारिष्ट, अशा आयुर्वेदिक वनस्पतींच्या वापराने आराम पडतो. मात्र यासाठी आयुर्वेदिक तज्ञांच्या मदतीने योग्य सल्ला व औषध घेणे आवश्यक आहे. पाळीच्या वेळेस होणाऱ्या बद्धकोष्ठावरही आयुर्वेदात प्रकृतीनुसार उपचार आहेत.

मासिक पाळी हा रोग नसून स्त्रीच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक नैसर्गिक अविष्कार आहे. याचमुळे स्त्रीला आई होण्याचा सुंदर अनुभव प्राप्त होणार असतो. अशा सकारात्मकतेने या कालखंडाला सामोरे जाणे, समस्या ओळखून योग्य तज्ञाकडे जाऊन, शरीराला तोटे न होता नैसर्गिक उपायातून त्यांचे निराकरण करणे असा योग्य मार्ग प्रत्येक स्तस्त्रीने धरायला हवा. तरच जगणे आनंददायी होऊन मन शांत, प्रसन्न राहील.

मासिक पाळीच्या समस्या आयुर्वेद

 

मासिक पाळी व आयुर्वेद याविषयी अधिक माहिती जाणून घ्या

आयुर्वेद तज्ञ डॉ. विनेश नगरे यांची ही मुलाखत पहा. सर्व नवीन व्हिडिओजची माहिती मिळविण्यासाठी खालील यूट्यूब बटणवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.

Subscribe

About SMV Ayurveda

Shri Maulivishwa Ayurveda Research Center is dedicated to research in Ayurveda for women’s health. Vaidya Vinesh Nagare, who is a gynecologist, specializes in Ayurvedic Treatment for Infertility, PCOD/PCOS and other menstrual problems of women.

Get in Touch

Facebook

Youtube Subscribe

Latest Blogs

Categories

Are you looking for appointment?