मासिक पाळी व स्त्रीबीज
गर्भधारणेसाठी तयार झालेले गर्भाशयाचे अस्तर व बीजांडकोषामधील फलित न झालेले स्त्रीबीज रक्ताबरोबर शरीराबाहेर टाकली जाण्याची क्रिया म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळीला कारणीभूत असतं ते स्त्रीबीज. आयुर्वेदामध्ये स्त्रीबीजाला आर्तव असं म्हटलं आहे. आर्तव अग्नीस्वरूप असतं. मासिक पाळीच्या तक्रारी आणि त्याची चिकित्सा करताना स्त्रीबीज समजून घेणे महत्वाचे ठरते.
तीन प्रकारचे अग्नी शरीरात आहेत. जाठराग्नी जो आपण खाल्लेलं पचवतो. आहाररसाची निर्मिती करतो. त्यातून रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र हे सात धातू बनतात. ते शरीराला धारण करतात. या धातूंमध्ये काम करणारा अग्नी म्हणजे सूक्ष्म अग्नी. आणि बीजातून नवीन शरीर निर्माण करायला लागणारा सूक्ष्मातिसूक्ष्म अग्नी म्हणजे आर्तवाचा अग्नी. या तिन्ही अग्नीना आपण जपलं तर त्याचा उत्तम परिणाम दिसतो. हा अग्नी जपतात ते तीन दोष- वात, पित्त व कफ. त्यांचं हवं.
मासिक पाळीच्या तक्रारी कोणत्या ?
पीसीओडी ही मासिक पाळीची मोठी समस्या आहे. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिन्ड्रोम हा स्त्रियांच्या प्रजननसंस्थेशी संबंधित अंत:स्रावी आजार आहे. बीजांडकोषात निर्माण होणारी बीजांडे अपुरी वाढ झाल्याने बीजांडकोषातच साठत जातात. त्यामुळे बीजांडकोषाला सूज येते. याला पीसीओडी म्हणतात. यात बीजांडकोषात गाठी दिसतात. काही मुलींना सर्व लक्षणे असतात मात्र सोनोग्राफीत गाठी दिसत नाहीत याला पीसीओसी म्हणतात. या रोगांमध्ये हवामान व ऋतूनुसार उपचार करावे लागतात.
पाळीपूर्वी होणारे त्रास व त्यावरील उपाय
काही स्त्रियांना पाळी येण्याच्या काही दिवस आधी विशिष्ट त्रास जाणवतात. त्यावरही आयुर्वेदाने उपाय सांगितले आहेत.
• मळमळल्यास दालचिनी व वेलची चघळावी
• ताप आल्यास गुळवेलीचा काढा घ्यावा
• तोंडाला पाणी सुटत असल्यास पाव चमचा सुंठ व मध घ्यावा
• डोके दुखत असल्यास नाकात गाईचे तूप टाकावे
• स्तन कठीण वाटत असल्यास एरंड तेलाने हलका मसाज करावा
• उलटी होत असल्यास सुंठ, साखर,तूप व मोरावळा घ्यावा
• जुलाब होत असल्यास जायफळ घ्यावे, बेलाचा अवलेह करावा
• बद्धकोष्ठता जाणवत असल्यास रात्री झोपताना एरंडेल तेल घ्यावे , काळ्या मनुकांचे पाणी प्यावे
मासिक पाळीतील पोटदुखी
मासिक पाळीच्या तक्रारीपैकी ही सर्वात जास्त आढळणारी समस्या! काही स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखण्याचा त्रास होतो. कळा येतात. त्यामुळे अस्वस्थता येते व दैनंदिन रूटिनवर नकारात्मक परिणाम होतो. यावर काही सोपे आयुर्वेदिक उपाय केल्यास आराम पडतो. पाळी येण्यापूर्वी रात्री एक चमचा एरंडेल तेल घ्या. पाळीमध्ये पोटाला हलक्या हाताने तीळ तेलाने मसाज करून शेका. चिमूटभर हिंग तुपात परतून गरम पाण्याबरोबर घ्या. जेवणात नियमितपणे तिळाची चटणी घ्या. पाळी सुरू असताना योग्य विश्रांती घ्या. जास्तीची धावपळ करू नका.
इतर तक्रारींवर उपाय
मासिक पाळीत येणाऱ्या ताणतणावांपासून दूर राहण्यासाठी संवाद साधा. पाळीमध्ये अधिक रक्तस्त्राव होत असेल तर एक कप दिवसातून तीन वेळा घ्या. १ चमचा दुर्वांचा रस व खडीसाखर २ वेळा घ्या. लाल जास्वंदीचे फूल खडीसाखरेबरोबर खाल्यास रक्तस्त्राव कमी होतो. गाईच्या दुधाबरोबर नागकेशर चूर्ण किंवा मधाबरोबर आवळा चूर्ण घेतल्यासही उत्तम परिणाम दिसतात.
• पाळी सुरू असताना व्यायाम केल्यास वात वाढतो.
• शरीराला विश्रांती द्यावी.
• भरपूर झोपावे.
• चिडचिड करू नये.
• तिखट,तेलकट खाऊ नये.
• जीन्स सतत वापरल्याने शरीरात कोंडते. सतत जीन्स वापरू नये.
मासिक पाळीच्या तक्रारीवर खास सूचना
• पाळी अनियमित आहे व वजन कमी असेल तर आंबा खा.
• पाळीत रक्तस्त्राव कमी होत असेल तर खारीक,खोबरं, बदाम, हळीवाची खीर खा. हळीव रात्री भिजत घालून सकाळी दुधात उकळावे व खीर करावी. खजूर, सुकं अंजीर खा. जेवणात खोबरं घ्या. याने आर्तवाला सपोर्ट मिळतो.
• अग्नी वाढवायचा असेल तर तिळाची चटणी खा, कोरफडीचा गर आणि मध सकाळी एकत्र घेतल्यास पाळीला खूप उपयोग होतो.
• पाळी येत नसेल तर काळी तीळ चांगले उकळावे. या काढ्यात प्या.
• पाळीत अंगावर पाणी किंवा पांढरं जात असेल किंवा त्याला वास येत असेल तर गुळवेलीचा काढा किंवा त्रिफळा चूर्ण उपयुक्त ठरतं. त्रिफळा चूर्णाचा १ ग्लास काढा टबात टाकून त्यात बसा.
मासिक पाळीच्या तक्रारी व आयुर्वेद याविषयी अधिक जाणून घ्या.
आयुर्वेद तज्ञ डॉ. विनेश नगरे यांची ही मुलाखत पहा. सर्व नवीन व्हिडिओजची माहिती मिळविण्यासाठी खालील यूट्यूब बटणवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.