मागील भागात आम्ही ‘लहान मुलांचे आजार आणि सोपे घरगुती आयुर्वेदिक उपचार’ या विषयावर सविस्तर माहिती दिली होती. आज आपण बाळगुटी म्हणजे काय, कशी बनवावी, कधी द्यावी, कशी द्यावी याविषयी माहिती देणार आहोत.
बाळगुटी म्हणजे काय?
बाळगुटी ही बाळाच्या तब्येतीसाठी खूप उपयुक्त असते. मध्ये 20 ते 30 औषधांचा संग्रह असतो. पण आजकाल बाजारात उगाळून किंवा ड्रॉप्स किंवा सिरप स्वरूपात मिळते. पण बालकांना तयार न देता घरी गुटी उगाळून देण्याचा आग्रह धरावा. घरी उगाळून दिल्यामुळे बाळाच्या अजारा नुसार बदल करता येतो.
आजकालच्या पालकांना बाळगुटी कशी द्यावी? कधी द्यावी? कधी सुरू करावी? किती वेळा द्यावी? असे प्रश्न समोर येतात त्यामुळे रेडिमेड देण्याकडे कल जास्त असतो. आज आपण या लेखात विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
बाळगुटी साहित्य
बाळगुटी मध्ये खारीक,बदाम,सुंठ,वेखंड,जेष्ठमध, सुरवारी हिरडा,हळद, अतीविष, मुरुडशेंग, पिंपळी, जायफळ, मयफळ, सागरगोटे, वावडिंग,अश्वगंधा, बेहडा, सोने यांचा समावेश असतो. साधारणपणे रोज आपण खारीक, बदाम, सुंठ, वेखंड, जेष्ठमध,अश्वगंधा, सोने ही औषधे उगाळून देऊ शकतो.
त्रासानुसार वरील औषधी कसे वापरायचे ते आपण बघणार आहोत.
बाळगुटी कधी द्यावी?
बाळ सकाळी उठल्या उठल्या द्यावी.
बाळगुटी कशी करावी?
प्रथम सहान गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. नंतर आईच्या दुधाचे ५ ते १० थेंब घेऊन त्यात बाळ जेवढ्या महिन्याचे असेल तेवढे वेढा प्रत्येक औषधांचा द्यावा. आईला जर दूध पुरेसे येत नसेल तर गाईच्या दुधातून बाळगुटी द्यावी
बाळगुटी कशी द्यावी?
- अगदी लहान मुलास जर ताप खोकला जंत झाले असतील तर अतिविष , वावडिंग, पिंपळी मधात गाळून चाटवावे.
- पोटात वाद झाल्यामुळे जर बाळाच्या पोटात दुखत असेल तर वेखंडाचा एक वेढा उगाळून त्याचा पोटावर लेप द्यावा.
- लहान बाळाला जुलाब होत असतील तर मायफळ दुधात उगाळून चाट वावे.
- पोटात मुरडा येऊन बाळाला शौचास होत असेल तर मुरुड शेंग व सुंठ ताकात उगाळून थोडे गरम करून चाट वावे.
- बाळाला ताप, जुलाब सोबत झाले असेल तर पिंपळी, अतिविष, काकडशिंगी यांचे एक एक वेढा मधात उगाळून बाळास चाटवावे. किंवा मायफल व सुंठ यांचा एक एक वेढा तुपात उगाळून द्यावा.
- बाळाला जर मल वाढता होत असेल तर मधील जायफळ बंद करून हिरड्यांचे वेढे वाढवावेत.
- बाळाला पातळ शौचाला होत असेल तर मधील सुंठीचे वेढे वाढवावेत व हिरड्यांचे वेढे कमी करावेत.
- बाळगुटी मधील पिंपळी ही उष्ण स्वभावाची असल्यामुळे तिचा एकच वेढा द्यावा.
- बाळाची बुध्दी चांगली होण्यासाठी बाळाला एक वर्षापर्यंत सोने व वेखंड उगाळून द्यावे.तीन वेढ्याने सुरुवात करावी प्रत्येक महिन्यात एक वेढा वाढवावा.
- बाळाला कोरडा खोकला असेल तर जेष्ठमध मधात उगाळून चाटवावे.
- बाळाचे जर वजन कमी असेल तर अश्वगंधा व खारीक यांचे मधील वेढे वाढवावेत.
जुलाब, ताप, खोकला असेल तर घरी ३ ते ४ दिवस उपाय करावेत. जर फरक नसेल पडत तर जवळच्या वैद्यांना दाखवून चिकित्सा करावी. लहान मुलांचे आजार आणि त्यावरील सोपे घरगुती आयुर्वेदिक उपचार या विषयी माहिती मिळवण्यासही आमचा हा लेख जरूर वाचा.
आपल्या कोणत्याही चौकशी साठी आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.
आयुर्वेद चिकित्सेसाठी Appointment बुक करा
कंबरदुखी आणि त्यावरील घरगुती उपाय याविषयी जाणून घ्या
कंबरदुखी साठी घरगुती उपाय जाणून घ्या जे १००% आयुर्वेदिक आहेत! कंबरदुखी पासून मुक्ती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पहा.